Introduction:
नमस्कार मित्रांनो, आजकाल मनोज जरांगे पाटील हे नाव सध्या खूप चर्चेत आहे आणि त्याला कारणही तसेच आहे. मराठा समाजाच्या मागणीसाठी त्यांनी खूप मोठे आंदोलन उभे केले आहे आणि ते यशस्वी सुद्धा केले आहे. त्यांचा जीवन परिचय आणि संघर्ष आपण ह्या ब्लॉग मध्ये जाणून घेणार आहोत. हा ब्लॉग वाचल्यानंतर तुम्हाला 'Manoj Jarange Patil Biography' मिळून जाईल त्या साठी आपण हा ब्लॉग संपूर्ण वाचा.
Manoj Jarange Patil Biography
![]() |
| Manoj Jarange Patil Autobiography |
बालपण आणि कुटुंब परिचय:
मनोज जरांगे पाटील यांचा जन्म 1 ऑगस्ट १९८२ रोजी बीड जिल्ह्यातील मातोरी या गावात झाला. त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिति ही सामान्य होती. त्यांचे प्राथमिक शिक्षण मातोरी ह्याच गावात झाले, त्या नंतर त्यांनी १२ वि पर्यन्त शिक्षण घेऊन पोटा - पाण्यासाठी जालना जिल्ह्याची वाट धरली.
कुटुंब:
आई, वडील, पत्नी (सौमित्रा), मुलगा (शिवराज ), पल्लवी, प्रणाली, वैष्णवी (मुली)
राजकीय आणि सामाजिक संघटना प्रवास:
१२ वि पर्यन्त शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी अंबड (जिल्हा जालना ) ची वाट धरली, तिथे त्यांनी एका हॉटेल मध्ये वेटर ची नोकरी धरली पन त्यांना समाजकरणाची ओढ शांत बसू देत नव्हती, त्यांचा स्वभाव बोलका आणि मनमिळावू होता. राजकारण आणि समाजकरणाची आवड असल्याने त्यांनी वेटर ची नौकरी सोडली आणि कॉँग्रेस जॉइन केली. कॉंग्रेस मध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांनी कामांचा धडाकाच लावला, त्यांच्या कामाचा धडक बघून त्यांना जालना जिल्ह्याचे युवा कॉंग्रेस चे जिल्हाध्यक्ष पद देण्यात आले. त्या नंतर त्यांनी पक्षानी काही मुद्दयाबद्दल घेतलेली भूमिका न पटल्याने कॉंग्रेस सोबत फारकत घेतली. पन त्या नंतर ही त्यांनी आपली धडाकेबाज कामगिरी सुरूच ठेवली आणि समाजाच्या विविध मागण्या साठी आंदोलने उभी केली.
२०११ साली मराठा समाजाला आरक्षण मिळावे या साठी त्यांनी 'शिवबा ' या संघटनेची स्थापना केली. संघटणे मार्फत मराठा समाजासाठी अनेक आंदोलने उभी केली, गावा- गावात जाऊन कार्यकर्ते उभे केले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या साठी त्यांनी त्यांची जमीन ही विकली आणि सोने गहाण ठेवले. १-२ वर्ष नव्हे तर तब्बल १६ वर्षे ते विविध आंदोलनांचा आवाज बनले, २०१२ मध्ये त्यांनी जायकवाडी धरणातून शेतकऱ्यांसाठी पानी सोडावे म्हणून केलेले आंदोलन चांगलेच गाजले, त्या नंतर २०१६ मध्ये घडलेल्या कोपऱ्डी च्या घटनेतील आरोपी ना कोर्टात नेताना त्यांना मारहाण केल्याचा आरोप त्यांच्या वर झाला.
२०१३-२०१४ मध्ये मराठा आरक्षणा साठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर केलेले आंदोलन सुद्धा बरेच गाजले, तसेच बऱ्याच कुटुंबाना शासकीय मदत मिळण्यासाठी आंदोलने केली. २०२१ साली सष्ट पिंपळ गाव या गावामध्ये ठिय्या आंदोलन केले जे तब्बल ३ महीने चालले. राज्य सरकारच्या विविध बैठकमध्ये मराठा समाजाचे प्रतिनिधित्व केले. वेग वेगळ्या आंदोलनामुळे मनोज जरांगे पाटील हे नाव मराठवड्यामध्ये बऱ्यापैकी प्रचलित झाले होते पन बाकीच्या भागात हे नाव फारसे कोणी ओळखत नव्हते.
२०२३ मध्येही त्यांनी असेच आंदोलन उभे केले ज्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि त्याची दाखल खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घ्यावी लागली, एकनाथ शिंदे यांनी आपल्या मागण्या मान्य करतो या अटीवर त्यांना आंदोलन मागे घयला लावले पन त्या नंतर त्या वर काहीच कारवाई झाली नाही. मग उजाडला ऑगस्ट २०२३ चा महिना, अंतरवली सराटी ता. आंबड जी. जालना येथे त्यांनी आमरण उपोषण चालू केले, त्यांच्या उपोषणाला पाठिंबा मिळत राहिला. उपोषण सुरू असताना त्यांची तब्येत खालावली तेव्हा प्रशासन आणि आंदोलन कर्ते या मध्ये जरांगे पाटील यांना उपचार मिळण्यावरून वाद निर्माण झाला आणि पोलिस आणि आंदोलन स्थळी जमलेले नागरिक या मध्ये वाद झाला आणि त्याचे रूपांतर लाठी चार्ज मध्ये झाले आणि ह्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. ह्या घटणे नंतर मनोज जरांगे पाटील हे नाव पूर्ण राज्याला माहीत झाले, आणि आंदोलन पूर्ण राज्यभर पसरले; ठीक-ठिकाणी आंदोलने झाली. अंतरवली सराटी हे राज्याच्या केंद्रभागी आले, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार आदि राजकारणी मांडळींनी जरांगे पाटील यांच्या आंदोलन स्थळी भेट दिली तर शासना तर्फे नीतेश राणे आणि गिरीश महाजन यांनी भेट दिली.
उपोषण मागे घेतल्यानंतर त्यांनी राज्यात ठीक-ठिकाणी सभा घेतल्या ज्याला उस्फूर्त असा प्रतिसाद भेटला. नंतर त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे ह्या मागणीसाठी मुंबई येथे आझाद मैदानावर उपोषण करण्याचा निर्णय घेतला. त्या सोबतच त्यांनी त्यांच्या गावातून ते मुंबई पर्यन्त मराठा क्रांति मोर्चा चे आयोजन केले ज्याला अति प्रचंड असा प्रतिसाद मिळाला, लाखों लोक ह्या मोर्चा मध्ये सामील झाले. मोर्चा मुंबई च्या वेशींवर जमा झाला असताना त्यांनी वाशी येथे सभा घेतली, तेवाच मुख्यमंत्री त्यांना भेटायला आले आणि त्यांनी जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य असल्याचे जाहीर केले आणि तसा अध्यादेश ही जाहीर केला; तेव्हा कुठे हे आंदोलन शांत झाले. ह्या सर्व संघर्षात त्यांच्या शरीराचे प्रचंड हाल झाले, सारखे उपोषण केल्यामुळे त्यांची तब्येत सतत खालवत राहिली पन तश्या परिस्थितीत ही ते सतत आपल्या समाजाच्या मागण्या सरकार पुढे मांडत राहिले.
![]() |
| उपोषण करताना जरांगे पाटील ह्यांची स्थिति ही अशी झाली होती |
त्यांच्या ह्या संघर्षामुळेच त्यांना 'संघर्ष योद्धा' असे नाव देण्यात आले. कुठल्या एखाद्या समाजाचे नेतृत्व करायचे असेल तर पैसा आणि रुबाबदार व्यक्तिमत्व असावे लागते असा समाज त्यांनी खोडून टाकला, आपले इरादे साफ असतील तर आपल्या पाठीशी जग उभा राहते याचाच प्रत्यय यांनी दिला. आजही ते तेवडच काम करत आहेत आणि मराठा मागण्यासाठी झटत आहेत.
Conclusion:
तर मित्रांनो ही होती मनोज जरांगे पाटील यांची छोटीशी biography. आशा करतो की तुम्हाला ह्या ब्लॉग चा विषय 'Manoj Jarange Patil Biography' आवडला असेल, जर आवडला'असेल आपल्या मित्रांना आणि नातेवाईकणा share करायला विसरू नका. ध न्य वाद !!!


0 Comments